Air India is sinking ship

vedvati(57)
Published in
#air
Words
114
Reading
1 min
Listen
Play
8y

आजमितीस एअर इंडियाच्या डोक्यावर ५० हजार कोटी रुपयांचे महाकर्ज आहे आणि तिचे खासगीकरण करायचे म्हटले तरी या पांढऱ्या हत्तीस कोणी हात लावायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. यंदाच्या ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरीस जाहीर झालेल्या तपशिलानुसार यात १७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज हे केवळ विमानांच्या खरेदीचेच आहे.

खेरीज दैनंदिन संसार चालवण्यासाठी उचल घ्यावी लागते ती आहे ३१,५१७ कोटी रुपयांची. हे इतके करूनही या सरकारी विमान कंपनीचा संचित तोटा सुमारे ३५७९ कोटी रुपयांचा. तेव्हा यावरून या कंपनीच्या आर्थिक दुरवस्थेची कल्पना यावी. परिस्थिती इतकी गंभीर की एअर इंडियास कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतकीही उसंत नाही. इतकेच नव्हे तर अवघ्या काही महिन्यांपूर्वी या विमान कंपनीस सुमारे हजारभर कोटी रुपयांची उचल घ्यावी लागली होती. नुसताच येड्याचा बाजार

Air India is sinking ship | Ecency