Rent a boy friend

markchu(52)
Published in
#life
Words
116
Reading
1 min
Listen
Play
8y

सहसा बॉय-फ्रेण्ड म्हणजे प्रियकर अशी सहसा संकल्पना असते. पण, या अॅपमध्ये बॉय-फ्रेण्ड असे वेगळे शब्द लिहिण्यात आले आहेत. या अॅपमधील नियमानुसार मानसिक तणाव घालविण्यासाठी फक्त याचा वापर करण्यात येणार आहे. इतर कारणासाठी नाही.
मुंबई आणि पुणे शहरात मर्यादित असलेली ही सुविधा लवकरच अन्य शहरात विस्तारीत करण्यात येणार आहे. नैराश्य हे कोणत्याही वयात येवू शकते. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होऊन विविध अपघात होऊ शकतात. मन मोकळे करण्यासाठी खास या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वसामान्य व्यक्तीसाठी अवघ्या काही रुपयांत याचा फायदा घेता येणार आहे. तर, सेलिब्रिटीसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

'आरएबीएफ' असे या अॅपचे नाव आहे. 15 ऑगस्टपासून अॅप लॉन्च करण्यात आले आहे. जागरुकता निर्माण करणे हा एकमेव या अॅप सुरु करण्यामागचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

Rent a boy friend | Ecency