सहज सुचल म्हणून,

सहज सुचल म्हणून,

काल संध्याकाळी जॉगर पार्कमधे शेजारच्या बेंचवर एक अख्खे मराठी कुटुंब गप्पा मारत होते.
साधारण पाच वर्षांचा मुलगा, त्याचे आई-बाबा आणि आज्जी होती. मुलगा नुसता पळत होता. मग दमला. तहान लागली. आईकडे पाणी मागितले. तसे त्याच्या आजीने तत्परतेने त्याला पाणी दिले. दमलेला मुलगा ती छोटीशी बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायला. बाटली आजीला परत करून पुन्हा मस्ती करायला पळणार तोच त्याची आई म्हणाली, "राजन, आजीला थॅन्क्स म्हणालास का?" .... मी शॉकड् ! आज्जीला कसले थॅंन्क्स..??

आजी ओशाळली. राजनने भाव खाल्ला. आई चिडली. आजी आणखी ओशाळली. राहू दे म्हणाली. आई आज्जीला म्हणाली, "नाही हा आई, या वयातच सवयी लागायला हव्यात" राजनच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली. मग राजन औपचारीकता दाखवत थॅंन्क्यू आज्जी बोलत पसार झाला.

असच एकदा आम्ही बागेत बाकड्यावर बसून गप्पा मारत होतो. शेजारी दोन कुटुंबांची भेट झाली. म्हणजे दोन आया आणि त्यांची गार्डनमध्ये खेळायला आलेली मुले. वयोगट हाच. चार ते पाच. त्या आयांनी आधी मुलांना प्रथेप्रमाणे एकमेकांशी शेकहॅण्ड करायला लावले. त्यानंतर ती दोन्ही मुले अनुक्रमे जे वेफर्स आणि बिस्कीट खात होती ते त्यांना एकमेकांशी शेअर करायला सांगण्यात आले.वेफर्स खाण्यार्‍या मुलाने लाडाने एक वेफर् समोरच्याला ऑफर केले. पण बिस्कीट खाणार्‍या मुलाने ईच्छा असूनही ते घेतले नाही कारण त्याबदल्यात त्याला आपली बिस्कीट शेअर करायची नव्हती.
झाले, त्या बिस्कीटवाल्या मुलाच्या आईला ईतके लाजिरवाणे वाटले की तिचे दुसर्‍या बाईला सॉरीही म्हणून झाले. आणि मग ती बाई दूर जाताच आपल्या मुलाला रागावूनही झाले. मुलगा आधी चिडला,आणि मग खेळायला निघून गेला.
तर मुलांनी आपला खाऊ आणि खेळणी एकमेकांशी शेअर करावेत हे संस्कार चांगलेच आहेत. पण काही बाबतीत त्यांना ते जमेलच असे नसते. शेवटी लहान मुलेच ती, कुठे जीव अडकेल त्यांनाच माहीत. पण आपल्या मुलांना खाऊ शेअर करायचे साधे मॅनर्स नाहीत याचा एवढा प्रेस्टीज ईश्यू करायची खरंच गरज असते का?

माझी या दोन्ही किस्स्यांमध्ये तशी तक्रार नाही. कारण पॅरेंटींग हा एका मर्यादेपर्यंत ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे. आणि हे वरचे दोन्ही किस्से कदाचित त्या मर्यादेतच येत असावेत. त्यामुळे हे चूक आहे वा मुलांशी असे वागू नये वगैरे मला सांगायचे नाहीये, माझा तो अधिकारही नसावा. फक्त मला पर्सनली हे फारसे पटत नाही ईतकेच. ईतरांची मते जाणून घ्यायला आवडतील. अनुभवाचे बोल.

H2
H3
H4
3 columns
2 columns
1 column
Join the conversation now
Logo
Center