Market crashes

vedvati(57)
Published in
#market
Words
126
Reading
1 min
Listen
Play
8y

शेअर बाजारातीळ तब्बल ३०० समभागांनी आज वर्षभरातील नीचांकी lowest स्तर गाठला. अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष, सौदी अरेबियातील खनिज तेलाबाबतची अनिश्‍चितता, चलन बाजारातील रुपयाचे अवमूल्यन आणि देशातील राजकीय घडामोडींनी शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचे पडसाद सकाळपासून बाजारात उमटले. वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य देत नफावसुली profitbooking केली.

बुधवारी अमेरिकन शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली होती. इन्फीबीम अव्हेन्यू १८ टक्के, डीश टीव्ही १७ टक्के, एमसीएक्‍स १४ टक्‍क्‍यांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर ३०० समभाग वर्षभराच्या नीचांकावर आले. यात आंध्र बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बीईएमएल, भारत फोर्ज, सिएट, ग्रासिम आदी समभागांचे मूल्य वर्षभराच्या नीचांकावर आले.

चलन बाजारात रुपयाचे मूल्य ११ पैशांनी घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांच्या अवमूल्यनासह ७३.२७ वर बंद झाला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेण्यात येत असल्याने डॉलरची मागणी वाढली असल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले.

Market crashes | Ecency