फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2018’ मध्ये विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी 21 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर 18.3 अब्ज डॉलर्ससह आर्सेलरमित्तलचे अध्यक्ष व सीईओ लक्ष्मी मित्तल तिसऱ्या स्थानी आहेत.
प्रेमजी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन अब्ज डॉलर्सची तर मित्तल यांच्या संपत्तीत 1.8 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. सर्वात श्रीमंत अशा पहिल्या 10 जणांमध्ये शिव नाडर (14.6 अब्ज डॉलर्स), गोदरेज कुटुंब (14 अब्ज डॉलर्स), दिलीप संघवी (12.6 अब्ज डॉलर्स), कुमार बिर्ला (12.5 अब्ज डॉलर्स) व गौतम अदाणी (11.9 अब्ज डॉलर्स) या उद्योजकांचा समावेश आहे.