रशियाशी जवळीक

vedvati(57)
Published in
#russia
Words
138
Reading
1 min
Listen
Play
8y

मित्रदेशांना धाब्यावर बसवत रशियाशी जवळीक साधण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांना ‘अमेरिका फर्स्ट’कडून ‘अमेरिका एकाकी’ या प्रवासाकडे नेतो आहे. हेलसिंकीमधील चर्चेत ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतल्याने पुतीन यांच्या धूर्त चालींना आणखी बळ मिळेल असे दिसते.
रशियाच्या वाढणाऱ्या भौगोलिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी जन्माला घातलेल्या ‘नाटो’ संघटनेच्या बैठकीत ट्रम्प इतर सदस्य देशांना निर्वाणीचा इशारा देताना दिसले.
trump-putin-press-conf.jpg
बोलणी सुरू करण्याआधीच बहुतेक वेळा पुतीन आपली बाजू भक्कम करून घेतात. कसलेल्या या राजकारण्याने, छंद म्हणून राजकारण निवडलेल्या ट्रम्प यांना फासात अडकवले आहे
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना जाहीर विरोध करीत त्यांनी आधीच भांबावलेल्या युरोपीय समुदायात वादाची भर घातली आणि पुतीन यांना अपेक्षित असलेला वाद सुरू करून ते फिनलॅंडमध्ये दाखल झाले. गेल्या महिन्यात झालेल्या ‘जी-७’ राष्ट्रांच्या परिषदेतसुद्धा ट्रम्प यांनी विचित्र भूमिका घेत सदस्य देशांना त्रास दिला होता. काही एक विचार करून प्रस्थापित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांमध्ये फूट कशी पडेल हेच ट्रम्प पाहात असल्याचे दिसते.

रशियाशी जवळीक | Ecency