सकाळच्या मीटिंग मधे तू तुझ्या संचालकाबरोबर टेबलच्या अगदी टोकाला बसला होतास . स्वतःच पद , वय , अनुभव , कर्तुत्व याच कसलंही ओझं न बाळगता, त्यामुळे ते ना दुसऱ्यांना देत होतास ...
बाहेरून पाहणाऱ्या नवीन माणसाला तू कोण आहेस हें कळतही नव्हतं, हान पण व्हिसीटींग कार्ड्स ची देवाणघेवाण होईपर्यंतच ....
मिटींग सुरू होतांना संस्थेच्या अध्यक्षांनी तुला मुद्दामून टेबलाच्या पहिल्या खुर्चीत बोलावून घेतले आणि मग चार तासांच्या मीटिंगभर तू तुझ्या शांत , संथ , आश्वासक सुरांत अनेक तापदायक मुद्दय़ांची उकल करत होतास . कुठेही कपाळावर अढी , आवाजात राग येऊ न देता ...उलट स्वतःवरच विनोद करत . सभेचे वातावरण विषयाला अनुकूल राहील याची पूर्ण काळजी घेत ...
सर्विस चार्जेस कमी झाले पाहिजेत अशी आग्रही मागणी होऊ लागली तेंव्हा मिश्किलपणे म्हणालास ...." चांगला बोनस मिळाला तर आवडतो बरं का मला " आणि मग स्वतःच्या सुटलेल्या पोटाकडे बोट दाखवत म्हणालास ..." माझ्या पोटाच्या आकाराचा तरी जरा विचार करा ...."