साधं शीर्षक लिहिताना सुद्धा इतकं एकाग्र व्हावं

Words
110
Reading
1 min
Listen
Play
8y

परवा घर आवरताना खूप जुने काही फोटो अचानक मिळाले .असे काही फोटो होते आणि ते आपल्याच घरात आहेत असं माझं मलाही आठवत नव्हते .

पण त्यादिवशी ते मिळाले आणि अगदी दुसऱ्या कामात व्यस्त असतानाही छळत राहिले .

काही फोटोंच्या मागे नुसती तारीख आहे .

काहींच्या मागे गंमतीदार शीर्षक .

काहीत काही तपशील .

43.jpg

एक फोटो पाहून तुझं एक वाक्य सारखं आठवत होतं ...." एक साधी तारीख , एक साधं शीर्षक लिहिताना सुद्धा इतकं एकाग्र व्हावं लागतं हे नव्हतं माहीत ..." .

हेच नाही ....

" एक सांगू का ... निगेटिव्ह कितीही चांगली वाटली तरी रोल धुतल्या शिवाय फोटो येतं नाही " हे तुझं वाक्य अगदी तुझ्या आवाजात घोळायला लागलं ......"

साधं शीर्षक लिहिताना सुद्धा इतकं एकाग्र व्हावं | Ecency