Sushana was my life

markchu(52)
Published in
#life
Words
132
Reading
1 min
Listen
Play
8y

तो कर्नाटक सीमावर्ती भागातला. आई-वडील मोलमजुरी करीत. थोरला बारा-तेरा वर्षांचा मुलगा खाटकाच्या दुकानात. हा सुशाणा धाकट्या बहिणींना सांभाळायचा. त्यांनी वर्षभरात स्वतःची झोपडी बांधली. सुशाणा आता कालवण भाकर घेऊन रोज येऊ लागला. भावंडांचा सांभाळ करता करता मदतीची कामे करू लागला त्याला मजा येऊ लागली, तो रोज गप्पा मारू लागलेला कधी मराठा कधी कन्नड कधी इंग्लिश . कधी अंगण झाड, कधी सारवण कर. माझ्या मुलांचे जुने कपडे त्याला दिले. तो चांगला राहू लागला. मी मुलांचा योगाभ्यास घेत होतो. पोरे धडे गिरवू लागली.

सुशाणा आता चांगले लिहू, वाचू लागला. "सर, तुम्हाला तीनच, पण मला तर मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिशपण येतेय ना?' असे तो विचारायचा. त्याचा डोळा दुखू लागला, तेव्हा त्याचे डोळे तपासून घेतले. चष्मा घेऊन दिला. मी सेवानिवृत्त झालो. मला सायटिकाचा त्रास झाला. आसनांबरोबर मसाजसेवेत सुशाणाचा सिंहाचा वाटा होता. सुशाणा आता पंधरा वर्षांचा झाला होता.

Sushana was my life | Ecency