गुज ओठांनी ओठांना सांगायचं

Words
58
Reading
1 min
9y
Listen to this post
~1 min

गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगात साकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं
गुज ओठांनी ओठांना सांगायचं
खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुस्सायचं
गुज ओठांनी ओठांना सांगायचं

गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं
गुज ओठांनी ओठांना सांगायचं

गुज ओठांनी ओठांना सांगायचं | Ecency